Take a fresh look at your lifestyle.

इंडस्ट्रीतील लोकं मलाही सुशांत बनवू इच्छितात; ‘या’ अभिनेत्याच्या विधानाने खळबळ

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येने फक्त बॉलीवूडच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यावरून बॉलीवूड मधील घराणेशाही वर आरोप देखील झाले होते. भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यांनी इंडस्ट्रीमधील लोकं मला सुशांत सिंह राजपूत बनवू इच्छितात म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

खेसारी लालने नुकताच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भोजपुरी इंडस्ट्रीमधील कोणाचेही नाव न घेता इंडस्ट्रीमधील लोकांवर निशाणा साधला आहे. मला असे वाटते भोजपूरी इंडस्ट्रीमधील लोकं मला दुसरा सुशांत सिंह राजपूत बनवू इच्छितात. जितकं प्रेम सुशांतला बॉलिवूडमध्ये मिळाले होते तसेच काहीसे आणि तितकंच प्रेम मला भोजपूरी इंडस्ट्रीतून मिळत आहे. पण मी इतका कमजोर नाही कारण प्रेक्षकांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. माहिती नाही लोकांना माझ्यामुळे काय त्रास होत आहे?’ असे खेसारी लाल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

पुढे तो म्हणाला, ‘मी २०११ साली इंडस्ट्रीमध्ये आलो. लोकांना ते आवडले नाही. बहुतेक माझे चित्रपट हिट ठरतात, मी समाजसेवा करतो त्यामुळे त्यांना मी आवडत नाही. लोकांना वाटत आहे मी देखील सुशांत सिंह राजपूतसारखे टोकाचे पाऊल उचलेन, पण मी असे काही करणार नाही. माझ्यासोबत जनता आहे, त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मी इंडस्ट्रीमध्ये टिकलो आहे. अस तो म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.