Take a fresh look at your lifestyle.

अभिनेते मिहिर दास यांचे किडनीच्या आजाराने निधन; वयाच्या 63’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिहीर दास यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येताच मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान ते ६३ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, कटक शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मिहीर दास हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या गंभीर आजाराने ग्रासलेले होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर डायलिसीसचे उपचार देखील सुरू होते. त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. दरम्यान १० डिसेंबर २०२१ पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर हि झुंज थांबली आणि मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मीडिया रिपोर्टनुसार, १० डिसेंबरपासून मिहीर दास यांची प्रकृती आधीपेक्षा जास्त बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला होता. मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले होते. पण याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मिहीर दास यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले कि, उडिया सिनेमासृष्टीसाठी मिहीर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते नेहमीच आमच्या स्मरणात राहतील. असे म्हणत नवीन पटनायक यांनी ट्विटच्या माध्यमातून मिहीर दास यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिवंगत दिग्गज अभिनेते मिहीर दास यांनी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टी गाजवली आहे. त्यांना १९९८ सालामध्ये लक्ष्मी प्रतिमा या सिनेमातून त्यांच्या करिअरला सुरुवात करण्याची संधी मिळाली. यानंतर २००५ सालामध्ये ‘फेरिया मो सोमा भाउनी’ या सिनेमासाठी मिहीर यांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. मात्र ‘पुआ मोरा भोलाशंकर’ या सिनेमाने त्यांना खरी ओळख दिली. यानंतर मिहीर यांना २००७ सालामध्ये ‘मु तावे लव करुची’चा सर्वोकृष्ट विनोदी अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. तर पुढे २०१० सालामध्ये त्यांना ‘प्रेम अधे व्याख्याना’त सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता.