Take a fresh look at your lifestyle.

.. रस्सा रस्सा वाढ! नानांचा शेतावर झणझणीत मटणाचा बेत; भुरके मारून बोटं चाटत उठली पंगत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर प्रत्येकालाच व्हायरल होण्याचा छंद नसतो. पण काही लोक असे असतात कि त्यांच्या कृती आपोआपच व्हायरल होतात. यांपैकी काही अतरंगी असतात तर काही मनाला भावणाऱ्या. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अत्यंत मानाने घेतले जाणारे नाव म्हणजे नाना पाटेकर. नानांची बात काही औरच आहे. नाना जितके चांगले कलाकार आहेत तितकेच समाजाप्रती विचार करणारे व्यक्तिमत्व आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओत नानांची स्वतः मटण बनवलंय आणि ते हि शेतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या सगळ्यांना जेवू घालण्याची संधी मिळाली, असे सांगत नाना चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून नवल वाटणे साहजिक आहे. पण नानांचा चाहता वर्ग इतका मोठा आहे कि हा प्रतिसाद अजूनही कमीच वाटतोय. नाना पाटेकर यांच्या मटणाच्या तांबड्या रश्श्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबूक अकाउंटवरुन शेअर केला आहे. सोबत कॅप्शनही दिले आहे. राहूप देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेयर करताना लिहिलंय की, मला एके दिवशी असं जगायला आवडेल. नाना तुम्हाला साष्टांग नमस्कार. जेवण अप्रतिम!”

राहुल देशपांडे यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत दिसतंय कि, नाना अतिशय सामान्य कपड्यांमध्ये बसले आहेत आणि ताट वाढत आहेत. शिवाय आजूबाजूला इतके लोक पंगतीत जेवायला बसल्यासारखे बसले आहेत आणि नानांनी बनविलेल्या झणझणीत मटणावर ताव मारत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर नानांचे कौतूक केले आहे. अनेकांनी नानांना धन्यवाद दिले आहे. तर अनेकांनी नानांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.