हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवसेंदिवस संपूर्ण राज्यात कोरोनाचे जाळे आपला विस्तार वाढवू लागले आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध घालून दिले आहेत. या नियमांचे नागरिकांकडून योग्यरीत्या पालन होत नसल्यामुळे दिवसागणिक कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. यामुळे अनेकजण मृत्यूच्या आगीत होरपळताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार कोरोनाची लागण होऊन निधन पावल्याचे वृत्त येत आहेत. आता यात आणखी एका कलाकाराने जगाचा निरोप घेतला आहे. नवनाथ गायकवाड या मराठी अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.
‘फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकलेले अभिनेता नवनाथ गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अखेर कोरोनाशी सामना करिताना त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्यांचे निधन झाले. नवनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटांत नवनाथ गायकवाड झळकले होते. अशा या बहुरूपी कलाकाराला ‘फत्तेशिकस्त’चे लेखक-दिग्दर्शक – अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक राज्यांत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्टात देखील कडक निर्बंधांसह लोकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र नागरिक अजूनही याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. अनेकजण विनाकारण बाहेर भटकत आहेत आणि नियमांचे पालनही करताना दिसत नाहीत. चित्रपटसृष्टीला कोरोनाचे सावट सोडता सोडेना झाले असून दिवसेंदिवस कलाकारांचे जीव आणखीच धोक्यात असल्याचे दिसत आहे. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आपापल्या परीने लोकांना याबाबत आवाहन केले आहे.
Discussion about this post