Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे गायन क्षेत्रात पदार्पण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता नवाझजुद्दिन सिद्दिकी याने आपल्या अभिनयाने स्वतःचा असा प्रचंड चाहत्यांचा वर्ग तयार केला आहे. त्याने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका करीत त्या पात्रांना न्याय मिळवून दिला आहे. पण आता अभिनयासोबत त्याने गायन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. अभिनयाबरोबरच आता एका गायकाच्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच नवाजने त्याचा आगामी चित्रपट ‘बोले चूड़िया’मधील ‘स्वैगी चूड़िया’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. ‘वाह पाजी.. तुम्ही गाणे गाण्यासारखे अवघड काम सोप्पे करून टाकलात’, म्हणत त्याने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे.

काही दिवसांपूर्वी नवाजचा म्यूजिक अल्बम ‘बारीश की जाये’ प्रदर्शित करण्यात आला होता. नवाजच्या या म्युजिक अल्बमला काही दिवसांतच लाखो लाइक्‍स आणि हजारो कमेंट्‌स मिळाले. प्रेक्षकांनी त्याच्या या अल्बमला भरभरून प्रतिसाद दिला होता. नवाजने गायन क्षेत्रात एन्ट्री करून प्रेक्षकांना अगदी थक्क केले आहे. त्यामुळे नवाजच्या या आगामी गाण्याबाबत सर्वच प्रेक्षकांची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.

‘बोले चूड़िया’ या चित्रपटात नवाजसह तमन्ना भाटिया हि अभिनेत्री दिसणार आहे. या चित्रपटातील ‘तुम पे हम तोह’ हे गाणे देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नवाजने किक चित्रपटात साकारलेला खलनायक आणि बजरंगी भाईजान मधील रिपोर्टर दोन्ही प्रेक्षकांना अत्यंत भाळला होता. मात्र नेटफ्लिक्‍सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरीजमधील त्याच्या गणेश गायतोंडे या भूमिकेने प्रेक्षकांना विशेष भुरळ पाडली.

यानंतर ‘ठाकरे’ चित्रपटात त्याने साकारलेली शिवसेना पक्षप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली होती. एकंदर अभिनेता म्हणून नवाजने आपली छाप लोकांवर सोडली आहे. आज लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेला नवाजुद्दीन गायक म्हणून त्याच्या चाहत्यांना किती आवडतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.