Take a fresh look at your lifestyle.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ संपणार; निरोप घेताना खलनायक साकारणारा अभिनेता झाला भावुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या सुरुवातीला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं. मात्र कालांतराने या मालिकेची लोकप्रियता ढासळली. कथेतील रंजकता खालावल्याने मालिकेचा टीआरपी घसरू लागला. यानंतर आता हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामध्ये मोहीत हे खलनायकी पात्र साकारणारा अभिनेता निखिल राऊत याने नुकतंच मालिकेतील शेवटच्या दिवसाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने भावुक होत आपला मोहितचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे.

निखिल राऊतने या पोस्टमध्ये लिहिले कि, अखेर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या आमच्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं… मी गेली २० वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहे ही माझी २५ वी मालिका. खरं तर माझं पात्र ‘ मोहित ‘ हे डिसेंबर महिन्यातच संपलं होतं परंतू ‘मी पुन्हा येईन ‘ ‘मी पुन्हा येईन ‘, असं प्रेक्षकांना वाटत होतं ,मला देखिल ते आवडलं असतं परंतू कथेचा शेवट जवळ आला आणि पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. प्रेक्षकांनी ,चाहत्यांनी ह्या मालिकेला, खलनायक असलो तरीही माझ्या ‘मोहित ‘ या पात्राला आणि आम्हा सर्वांच्याच पात्रांना खूप भरभरून प्रेम दिलं त्या बद्दल मनापासून आभार!

तसंच या मालिकेत काम करण्याची संधी दिल्या बद्दल Trump card productions निर्माते – तेजेंद्र नेसवणकर ,सुवर्णा रसिक राणे आणि झी मराठी वाहिनीचे निलेश मयेकर सर, सोजल सावंत, रेणूका जोशी, सिद्धार्थ मयेकर तसेच संपूर्ण झी मराठी वाहिनी चेही मनापासून आभार. लेखक -सुखदा आयरे, पल्लवी करकेरा, किरण कुलकर्णी, समीर काळभोर तसेच , दिग्दर्शक -अजय मयेकर, हरिष शिर्के, Direction team, Creative team, उत्तम production team ,माझे spot boys मित्र आणि माझ्या सर्व सहकलाकार मित्रांचे पण खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांमुळे मोहित हे पात्र साकारता आलं. Thank you so much Love you all. भेटूया लवकरच….

या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एकाने लिहिले ‘आम्हाला तुझ्या पात्राचा राग येणं हेचं आमचं तुझ्यावरचं प्रेम आहे. तर ‘तू सर्वोत्तम खलनायक ठरलास,’ असं दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं. निखिलने याआधीदेखील अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘काहे दिया परदेस’, ‘तू तिथे मी’, ‘राजा शिवछत्रपती’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड १९ मार्च २०२२ रोजी प्रसारित होणार आहे.