Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता नील नितीन मुकेशच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन  | महाराष्ट्र आणि देशभरात गणेशोत्सव अतिशय जोशात साजरा केला जातो. सध्या देशभर कोरोनाचे सावट असले तरी गणेशोत्सव साध्या पध्दतीने का होईना पण साजरा केला जाणार आहे.अनेक अभिनेते तसेच कलाकार दरवर्षी गणेशोत्सव साजरा केल्याचे फोटो शेअर करत असतात.अनेक जण आदल्या दिवशीच बाप्पाची मुर्ती आपल्या घरी आणतात. यामध्येच आता अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे.

नीलने इन्स्टाग्रामवर बाप्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बाप्पा घरी आल्याचा आनंद नीलच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया’, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

View this post on Instagram

GANPATI BAPPA MORYA 🤗🤗.

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

गणपती बाप्पा येणार असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा देशावर करोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर दरवर्षीप्रमाणे आनंद दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’