Take a fresh look at your lifestyle.

गर्दी पाहून अभिनेता प्रकाश राज यांचा चढला पारा; आपण कधीच शिकणार नाही आहोत का? असा केला सवाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने असंख्य लोक त्रस्त आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस एकएक करून वाढत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेसह, वैद्यकीय सोयीसुविंधावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे सरकार सांगत आहे. पण तरीही कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. नुकताच एका गर्दीचा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेता प्रकाश राज यांनी आपला असह्य संताप सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.

शासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता कडक निर्बंध तसेच लोकडाऊनचा निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आधीहून अधिक कडक करण्यात आलेले आहेत. असे असताना सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात अनेक महिला कोरोनाचे नियम पायदळी तुडवत करोना काळात पूजेसाठी एकत्र आलेल्या पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रकाश राजने लिहिले आहे की, गो करोना गो… आपण कधीच शिकणार नाही आहोत का? मी फक्त विचारत आहे.

अभिनेता प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन अनेक महिला पूजेकरीता जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. कोरोना यांच्यासाठी नसतो का? अशाच लोकांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक होतो, अशा भावनांचे प्रकटीकरण करणाऱ्या समीक्षा नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे देत आहेत. दरम्यान गुजरातमधील या प्रकरणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अहमदाबाद ग्रामीण भागाचे डीएसपी के. टी. खेमरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २३ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यात गावाच्या सरपंचांचाही समावेश आहे.