हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल ( LAC – Live the Battle) या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मात्र अचानकच सेटवर त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तात्काळ मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
५२ वर्षीय राहुलला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल रॉय यांचे बंधू रुमर सेन यांची या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहुल रॉय यांची प्रकृती आता सुधारत असल्याचेही त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.
कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे. प्रकृती बिघडल्यानंतर राहुल रॉय यांना प्रथम कारगिलहून श्रीनगरला आणि त्यानंतर मुंबई आणण्यात आले.
महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटामध्ये उल्लेखनिय काम केल्यानंतर ‘सपने साजन के’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘जनम’, ‘प्यार का साया’, ‘जुनून’, ‘पहला नशा’, ‘गुमराह’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका बजावल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’