Take a fresh look at your lifestyle.

परत एक स्वप्न पाहतोय, परत नवं ‘वेड’ मांडतोय; दिग्दर्शन क्षेत्रात अभिनेता रितेश देशमुखची एंट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने अव्वल स्थान मिळवलेला हरहुन्नरी अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही नवा प्रयोग करीत असतो. कधी अव्वल भूमिकेतून तो चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणतो तर कधी वेगवेगळ्या इंस्टा रिल्समधून तो चाहत्यांना हसायला भाग पडतो. यानंतर आता पहिल्यांदाच रितेश एक आव्हान घेताना दिसतोय. हे आव्हान आहे दिग्दर्शनाचं. ‘वेड’ या चित्रपटाच्या घोषणेसोबत रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पॉल ठेवल्याचे सांगितले आहे. याबाबत रितेशने स्वतःच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट केले आहे.

रितेशने केलेल्या ट्विटमध्ये त्याने एक न लिहिली आहे. या नोटमध्ये रितेशने लिहिलेय कि, वर्ष २००१. साधारण २० वर्षापुर्वीची गोष्ट. मी कॅमे यासमोर उभा राहिलो होतो. तेव्हा मनात भिती, उत्सुकता आणि जिद्द होती. पण ते स्वप्न होतं. काहींना वाटलं कि हा वेडेपणा आहे. नंतर आपण सगळ्यांनी अनेक आशीर्वाद आणि प्रेम देऊन हे #वेड जिंवत ठेवलं. वर्ष २०२१. मी कॅमे-याच्या मागे जाण्याचा वेडेपणा करतोय. मनात तशीच भिती, उत्सुकता आणि जिद्द आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असु द्या. परत एक स्वप्न पाहतोय. परत नवं #वेड मांडतोय – रितेश विलासराव देशमुख.

या चित्रपटात जिया शंकर, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे मुख्य भूमिकेत दिसतील. तर चित्रपटाचे संगीत मराठी इंडस्ट्रीतील अत्यंत नामांकित संगीतकार जोडी अजय अतुल यांचे असेल. तर पहिल्यांदाच रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्र सांभाळणार आहे. हा चित्रपट येत्या वर्षात १२ ऑगस्ट २०२२ रोजी येणार असल्याचे रितेशने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटाबाबत अनेक चाहत्यांनी उत्सुकता दर्शविली आहे.