Take a fresh look at your lifestyle.

सलमान-शाहरुख दिसणार एकत्र ; नव्या ऍक्शनपटात शेअर करणार स्क्रीन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पठाण’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात शाहरुखसोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील झळकणार आहे. परिणामी या दोन सुपरस्टार्सला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर पठडीतील चित्रपट आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात सलमान खान देखील झळकणार आहे. सलमान या चित्रपटात एक लहानसा कॅमियो सीन देणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. सिद्धार्थ आनंद याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार याबाबत कुठलीही माहिती अद्याप जाहिर केलेली नाही. येत्या काळात शाहरुख या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहे.

‘करण-अर्जुन’ या चित्रपटानंतर जरी हे दोघेही मोठ्या भूमिकांमध्ये एकत्र झळकले नसले, तरी मागच्या दशकांत त्यांनी एकमेकांच्या चित्रपटांत लहान-लहान भूमिका केल्या आहेत. सलमान खानने शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता. तर, शाहरुख खानने सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.