Take a fresh look at your lifestyle.

‘बिग बॉस १४’ साठी सलमान खान घेणार तब्बल ‘इतके’ मानधन?

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या रिअॅलिटी शोचे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सकुता पाहायला मिळते. आता ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोसाठी सलमान किती मानधन घेणार असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रत्येक वर्षी सलमान खानचे मानधनात वाढ होत असते. परंतु या वर्षी मात्र सलमानच्या मानधनात भरमसाठ वाढ झाल्याची माहिती आहे.बिग बॉस पर्व १४ साठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉसचे पर्व १३ हिट ठरले होते. त्यामुळे या सीझन बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. तसेच करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शोमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

हाती आलेल्या वृत्तानुसार, सलमान खानला ‘बिग बॉस 14’ साठी सुमारे 250 कोटींचे भरमसाठ मानधन दिल जात आहे. या शोसाठी तो आठवड्यातून एकदा दोन भागांचे शूटिंग करणार आहे. ज्यासाठी त्याला सुमारे 20.50 कोटी फी दिली जाईल. त्यानुसार त्याला एपिसोडसाठी 10.25 कोटी रुपये दिले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’