Take a fresh look at your lifestyle.

‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेक मध्ये दिसणार भाईजान सलमान खान

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आता आपल्या पुढच्या प्रोजेक्टसंदर्भात चर्चेत आला आहे. खरं तर, नुकताच त्याने 2018 मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी साइन केले आहे. या सिनेमात अभिनेता आयुष शर्माही दबंग खानसोबत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. सलमान आणि आयुष यांच्या या चित्रपटाला ‘अंतिम’असे नाव देण्यात आले आहे.

असे म्हटले जात आहे की या चित्रपटात सलमान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आयुष धोकादायक गुंड म्हणून काम करणार आहे. या चित्रपटाची कथा या दोघांमधील लढाईवरही लक्ष केंद्रित करेल. चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात 15 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, एका छोट्याशा गावात राहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची कहाणी चित्रपटामध्ये दाखविली जाणार आहे जो गुंडांना संपवण्यासाठी कायदा हातात घेतो. रिपोर्ट्सनुसार स्टुडिओमध्येच गावासारखा एक सेट तयार केला जाईल. तर चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई व कर्जत येथे होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि उडिया भाषेत देशभरातील पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.