Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता समीर खांडेकरचा उद्रेक; संपूर्ण शहर ऑक्सिजनशिवाय आणि आम्ही पाण्याशिवाय तडफडतोय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे न जाणे कित्येकांनी आपले प्राण गमावले आहेत. कुणाची ऑक्सिजनविना तडफड होतेय तर कुणाची औषध अभावी. मात्र अश्या या भीषण काळात जिथे माणसाला माणसाने साथ द्यायची, उम्मेद द्यायची गरज आहे अश्यावेळी अभिनेता समीर खांडेकर व त्याचे कुटुंब पाण्याविना जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. जवळ जवळ महिनाभर समीर पाण्यासाठी लढत करतोय. अखेर कोणताही पर्याय समोर दिसत नसल्याने व्यक्त व्हायचे कुठे? म्हणून सोशल मीडियावर त्याने आपबिती खुलासा केला आहे. त्याने फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना समीरने कॅप्शन मध्ये लिहिले, जवळपास महिनाभर शांत होतो. संतप्त होऊन हा व्हिडीओ बवनतोय..हे सगळं सहन करण्यापलिकडे गेलंय आता.. सगळ्यांना विनंती आहे..या व्हिडीओ मधल्या माझ्या भावना समजून घ्या..मला खात्री आहे माझ्यासारखेच अजून बरेच यातून गेले असतील..तेव्हा हा आमचा सगळ्यांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा..हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा..जमेल त्याला पाठवा..झुडपांत लपून गुरगुरणार-या या लांडग्यांना.. जरा फेमस करूया..#मीबोलणार

समीरने या व्हिडिओमध्ये हक्काच्या घरासाठी केलेली लढत ते आता बिल्डरकडून होणारा मानसिक छळ याबाबत आपली मनोव्यथा मंडळी आहे. यात तो म्हणतो आहे कि, सध्या संपूर्ण शहर ऑक्सिजनशिवाय आणि आम्ही पाण्याशिवाय तडफडतो आहोत. महिन्याभरापूर्वी पालिकेकडून पाण्याची लाईन कापून टाकली असता याबाबत विचारणा केल्यानंतर, हे पाणी तुमच नव्हतंच. किंबहुना तुम्हाला बिल्डरने अधिकृत पाण्याची लाईन दिलेलीच नाही. तसेच तुम्ही वापरत असलेले पाणी बिल्डरने चोरून आणले होते, अशी त्यांना माहिती मिळाली. इतकेच नव्हे तर बिल्डरने २०१२-१३ पासून असेसमेंट टॅक्स, मालमत्ता कर भरलेला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, असे पालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुढे त्याने खासदार. श्री.गोपाळ शेट्टी त्यांचे सहकारी श्री.सरवणकर आणि अभिनेता अविनाश नारकर यांचा उल्लेख करीत त्यांच्या मदतीमुळे बिल्डरने फोन रिसिव्ह केला आणि टॅक्स भरतो असे आश्वासनही दिल्याचे सांगितले आहे. मात्र यानंतर बिल्डरने रहिवाश्यांना मेन्टेनन्सची भरणा करण्यासाठी धमक्या देत असेसमेंट टॅक्सही भरण्यास सांगितले आहे. विभागातील एसीपी यांच्याकडून बिल्डरच्या माणसांना यासंदर्भात समज देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही आहे.

अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो. मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. मी व्यक्त होणाऱ्या चित्रपटात काम करतो. मी एक अभिनेता आहे. मी एक सुजाण नागरिक आहे. तसेच मला माझ्या प्रेक्षकांवर आणि हा व्हिडीओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर कृपया आमचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत व याबाबत जाणकार असणाऱ्या व्यक्तींपर्यंत लवकरात लवकर पोहचवा. अशी कळकळीची विनंती समीरने केली आहे. सोबतच निर्भीडपणे आपला संपूर्ण पत्ता आणि बिल्डरची माहिती त्याने या व्हिडिओतून पुरविली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर अनेकजण समीरला पाठिंबा देत बिल्डरच्या कृत्याची निंदा करीत आहेत.