Take a fresh look at your lifestyle.

..एकही पक्ष किंवा एकही नेता..; महाराष्ट्रातील राजकारणावर संदीप पाठकची टीका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत तेच समजेना. कारण सामान्य जनतेसोबत मुळ मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मविआच्या नेत्यांवर इडीच्या धाडधाड कारवाया होताना दिसत आहेत. यातही पक्षातील नेते मंडळी गप्प बसतील तर शपथ.. यानंतर काय तर भोंगे हटवाची मागणी. आता काय बोलायचं यावर..? राजकारणातील चिखलफेक पाहून जनतेला जगू कि नको असा प्रश्न पडलेला असताना पक्षश्रेष्ठी मात्र निवांत आहेत. आपापसात भिडण्यात हे इतकं व्यस्त आहेत कि त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला काही वेळ नाही. या परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठकने जबरदस्त टीका करणारे एक ट्विट केले आहे जे सध्या चांगलेच चर्चेत आहे.

अभिनेता संदीप पाठक याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. हे ट्विट करीत असताना अभिनेता संदीप पाठक याने लिहिले कि, “सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या..” असे म्हणत राज्याच्या राज्यकारभारावर नाराजी व्यक्त करणारे संदीपचे हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्याची ही पोस्ट सध्या एका मूळ चर्चेचा विषय ठरतेय. संदीपने याआधी देखील अशाच पद्धतीने ट्विटच्या माध्यमातून राज्यातील प्रश्नांवर खुले भाष्य केले आहे.

अभिनेता संदीप पाठक याने आपल्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात नाट्य क्षेत्रातून केली आहे. आपल्या लक्षवेधी आणि प्रतिभावान अभिनय शैलीसाठी तो प्रसिद्ध आहे. ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ या नाटकाला संदीप पठणके जगभरातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्याच कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना भयंकर आवडत. त्याने कॉमिक अभिनयाशिवाय इतर चित्रपटात गंभीर भूमिका देखील साकारल्या आहेत. त्याने २००४ मध्ये ‘श्वास’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. पुढे येड्याची ‘जत्रा’,’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘भुताचा हनीमून’ या चित्रपटातदेखील त्याने अव्वल भूमिका साकारल्या आहेत.