Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता संजय दत्तची तब्बेत बिघडली ; लीलावती रुग्णालयात दाखल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेता संजय दत्तची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त समोर येत आहे.त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संजय दत्तला श्वास घेताना त्रास होतोय.त्याची ऑक्सिजन  होत आहे अशी माहिती समोर येत आहे.दिलासादायक म्हणजे संजय दत्त यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.त्यांना बिगर कोरोना वॉर्डात शिफ्ट आहे.

संजय दत्त यांनी ट्विट करून याबद्दल स्वतः च माहिती दिली आहे.

संजय दत्त ट्विट करून म्हणाले , ”सर्वाना सांगू इच्छितो की मी ठीक आहे.माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून लीलावती हॉस्पिटलमधील  डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी करत असलेला मदतीमुळे आणि देखभालीमुळे मी एक-दोन दिवसात घरी परत येईन. तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.”

Comments are closed.