Take a fresh look at your lifestyle.

कॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तला कॅन्सरचे निदान झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि चाहते चिंतीत होते. पण संजय दत्ताच्या इच्छा शक्तीच्या जोरावर त्याने खूपच कमी कालावधीत कॅन्सर वर मात केली. नुकतीच कॅन्सरमुक्त झाल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांशी शेअर केली. या बातमीने चाहते सुखावले. कुटुंबात आनंद व समाधानाचे वातावरण पसरले. सध्या संजूबाबा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. याचदरम्यान त्याचे ताजे स्टाइलिश फोटो व्हायरल होत आहेत.

संजयच्या या नव्या लूकचे फोटो त्याचा हेअरस्टाइलिस्ट मित्र हाकिम आलिम याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात संजू शॉर्ट प्लॅटिनम ब्लॉन्ड हेअरस्टाइलमध्ये दिसतोय. दाढीसोबतचा त्याचा हा नवा लूक हिट झाला आहे. फोटोंमध्ये संजयने डिझाईनर चश्मा आणि कानात स्टड घातले आहेत. ब्लू टी-शर्टमधील त्याच्या दंडावरचा टॅटूही स्पष्ट दिसतोय.

काही दिवसांपूर्वी संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर करत कॅन्सरला मात दिल्याची बातमी दिली होती. ‘आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना मला अतिशय आनंद होतोय. गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझा परिवारासाठी फार कठिण होते. पण ते म्हणतात ना, देव सर्वात मजबूत शिपायालाच सर्वात कठिण लढाई देतो. आज माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी आनंदी आहे की, मी ही लढाई जिंकून परत आलो आहे. मी आज त्यांना सर्वात मोठे गिफ्ट देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. हे सर्व तुमच्या विश्वासामुळे आणि पाठींब्याशिवाय शक्य नव्हते. तुमच्या प्रार्थनांमुळे मी या आजारावर मात करू शकलो. अस संजय दत्त म्हणाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.