Take a fresh look at your lifestyle.

कॅन्सरशी झुंज सुरु असतानाच संजुबाबाने घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलीवूडचा संजुबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तला काही दिवसांपूर्वीच फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर खुद्द संजय दत्तने एक पोस्ट लिहित आपण कामाच्या व्यापातून काही काळासाठी विश्रांती घेणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं.

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर संजय दत्तवर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले. परंतु आता संजय दत्त यांनी एक आश्चर्य कारक निर्णय घेतला आहे.कलेवरील त्याचं प्रेम आणि कामाप्रती असणारी समर्पकता यांच्यामुळे संजुबाबा एका महत्त्वाच्या निर्णय़ावर पोहोचला आहे.

आजारपणामुळं चित्रपटांची कामं अडू नयेत यासाठी आता त्यानं चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅन्सरशी संघर्ष सुरु असतानाच संजूबाबाचा हा निर्णय अनेकांना भुवया उंचावनाराआहे. सुत्रांच्या माहितीनुसार संजय दत्त तर चित्रीकरणासाठी चित्रपटाच्या सेटवरही पोहोचला होता. दोन दिवसांच्या चित्रीकरणानंतर तो पुन्हा एकदा उपचारांकडे वळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’