अभिनेता संजय दत्तने गणेशोत्सवा निमित्त चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | आज संपूर्ण देश गणेश चतुर्थीच्या उत्सवात मग्न आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत प्रत्येकजण या शुभ उत्सवात बाप्पांची पूजा करण्यात आणि बाप्पांसोबत छायाचित्रे घेऊन हा क्षण संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करीत आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संजय दत्तने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ‘दरवर्षीप्रमाणे या वर्षी गणेश चतुर्थी हा सण मोठ्या प्रमाणात आयोजित केला गेला नसेल परंतु बाप्पांवरील आमचा विश्वास आणि श्रद्धा पूर्वीसारखीच आहे. माझी अशी प्रार्थना आहे की हा शुभ क्षण आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल आणि प्रत्येकास चांगले आरोग्य आणि आनंद देईल.
दरम्यान, नुकताच संजय दत्त ला फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या आजाराने ग्रासले असल्याची बातमीही समोर आली होती डॉक्टरांच्या मते संजय दत्तचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यानंतर संजय दत्तला काही महत्त्वपूर्ण चाचण्या करण्यासाठी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’