Take a fresh look at your lifestyle.

कॅन्सरला नक्कीच हरवेन ; संजय दत्तने व्यक्त केला विश्वास

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडचा मुन्नाभाई म्हणजे अर्थातच संजय दत्तला कॅन्सरचे निदान झाल्याने बॉलीवूडला खूप मोठा धक्का बसला. चाहत्यांना संजूबाबाच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली. त्यातच काही दिवसांपूर्वी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये संजय दत्तची तब्येत पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर पडली . पण, आता मात्र ही चिंता काहीशी दूर होत आहे. कारण, खुद्द संजूबाबानंच आपण या आजावर नक्कीच मात करु, असं म्हणत सर्वांनाच विश्वास दिला आहे.

नेहमीच आपल्या अनोख्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजय दत्त यानं कॅन्सरवरील उपचार सुरु असताना एक नवा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या हेअरस्टाईलसह संजूबाबा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तोसुद्धा अतिशय सकारात्मकत विचार घेऊन.

सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमनं सोशल मीडियावर संजय दत्तसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्यानं संजूबाबाला एक नवा लूक दिल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे हा लूक बी- टाऊनच्या या ‘मुन्नाभाईला चांगलाच शोभूनही दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.