Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या चिमुकल्यांचा बाबा; सोशल मीडियावर सांगितली बाळांची नावं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे जुळ्या चिमुकल्यांचा बाबा झाला आहे. संकर्षणच्या पत्नीने २७ जून रोजी एका गोंडस मुलाला आणि सुंदर मुलीला जन्म दिला. त्यानंतर पहिल्यांदाच संकर्षणने त्याच्या बाळांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली. इतकेच नव्हे तर त्याने चक्क सोशल मुद्यावरच आपल्या बाळांची नाव जाहीर करत त्यांचे नामकरणही केले. संकर्षणने शेअर केलेल्या फोटोत बाळांचा चेहरा दिसत नसला तरी त्यांच्या बाबाच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र दिसतोय. कितीक हळवे, कितीक सुंदर असे काहीसे हावभाव संकर्षणच्या चेहऱ्यावर झळकत आहेत.

परभणी पुत्र संकर्षण कऱ्हाडेने नेहमीच त्याच्या लेखणीच्या जोरावर सर्वांचे मन जिंकले आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार विशेष आणि मोठा आहे. त्याच्या अनेको चाहत्यांनी ह्या पोस्टवर खूप शुभेच्छा आणि प्रेम व्यक्त केले आज. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संकर्षणने त्याच्या बाळांची नावं आणि त्याचे अर्थ सांगितले आहेत. लेकाचे नाव सर्वज्ञ म्हणजे – सर्व जाणनारा, ज्ञानी आणि लेकीचे नाव स्रग्वी म्हणजे पवित्र तुळस…, असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. संकर्षण हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेच शिवाय लोकप्रिय सूत्रसंचालक आणि कवीदेखील आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअ‍ॅलिटी शो यांच्यामध्ये काम केलं आहे.

महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात २००८ साली संकर्षण दिसला. यानंतर त्याने ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये काम केले. पुढे झी मराठीवरच ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही केले. यासोबतच लोभ असावा, मी रेवती देशपांडे या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण दिसला होता. संकर्षण उत्तम अभिनेता म्हणून चर्चेत असतोच पण त्याहीपेक्षा जास्त तो त्याच्या कवितांमुळे ओळखला जातो. त्याने लिहिलेल्या कविता चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच एक नवी दिशा देणाऱ्या असतात. त्याच्या लेखणीत एक अशी जादू एक असे रसायन आहे जे भल्याभल्याना वेड लावेल.