Take a fresh look at your lifestyle.

NCB घरी येईल अस काही करू नको ; शाहिदचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सची हटके प्रतिक्रिया

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.शाहिद सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. दरम्यान त्याने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहिदचा हा व्हिडिओ प्रचंड वायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गाडीमध्ये बसला असून गाणे ऐकत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तो अचनाक विचित्र एक्सप्रेशन देतो. ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. हा व्हिडीओ शेअर करत त्याने त्याने ‘मूड’ असे कॅप्शन दिले आहे.

शाहिदचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तर ‘ भावा एनसीबी घरी येईल असे काही करु नकोस’ असे म्हटले आहे.

लॉकडाउननंतर आता शाहिद पुन्हा त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण डेहराडून येथे सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.