Take a fresh look at your lifestyle.

“मिशन मजनू” या आगामी चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थ मल्होत्रा जखमी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘मिशन मजनू’चं शूटिंग सध्या सुरू आहे. हा चित्रपट १९७० साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. याच शूटिंग सध्या लखनऊमध्ये सुरू आहे आणि शूटिंगसाठी सिद्धार्थ मल्होत्रा ​​लखनऊमध्ये आहे. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन मूव्ही असणार आहे. दरम्यान, सेटवर सिद्धार्थ मल्होत्रा ​​जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.

एका मिशनवर आधारित असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ अंडर-कव्हर ऑपरेटिव्हच्या भूमिकेत दिसणार आहे. शूटिंगच्या वेळी अ‍ॅक्शन सीन करीत असताना सिद्धार्थ जखमी झाला आहे. मात्र, जखमी झाल्यानंतरही सिद्धार्थने आपले सीन अर्धवट सोडले नाहीत. सिद्धार्थच्या पायाला लोखंडाचा तुकडा लागला आणि त्याला दुखापत झाली. अशा परिस्थितीत शूटिंग थांबवण्याऐवजी त्याने सेटवरच उपचार घेतले आणि शूटिंग पूर्ण केले. रिपोर्टनुसार, सिद्धार्थच्या गुडघ्याला दुखापत झाली तरी देखील, पुढचे तब्बल ३ दिवस शूटिंग चालू होती आणि दूखापती दरम्यानदेखील सिद्धार्थने शूटिंग पूर्ण केले.

‘मिशन मजनू’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये झालेलया भारतातील सर्वात मोठ्या मिशनची कथा आहे. या मिशन नंतर दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजकीय संबंध कायमस्वरूपी बदलले. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा रॉच्या एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू बागची करीत आहेत. या सिनेमात सिद्धार्थसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री व नॅशनल क्रश रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.