Take a fresh look at your lifestyle.

अश्लिल टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेता सिद्धार्थ नारायणने सायनाची मागितली माफी; ट्विटवर पोस्ट केला माफीनामा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी अलीकडचीच गोष्ट म्हणजे पंजाबमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या प्रकरणावर भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने एक ट्विट जरी केले होते. या ट्विटवर अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींच्या प्रतिक्रिया सकारात्मक तर काहींच्या नकारात्मक होत्या. आता पब्लिक फिगर म्हटल्यावर एव्हढं होणारच हे कुणीही सांगेल. पण या ट्विटवर टीका करत दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ नारायणने खालची पातळी गाठली आणि अश्लिल टिप्पणी केली होती. यामुळे त्याला ट्विटरवर चांगलाच ट्रोलदेखील केला होता. अखेर या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सिद्धार्थने सायनासाठी माफीनामा लिहीत माफी मागितली आहे.

सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून सिद्धार्थच्या टिप्पणीचा निषेध करणाऱ्या नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच पिळून काढले होते. यानंतर अखेर डोकं ठिकाणावर आल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ नारायणने स्पष्टीकरण जाहीर केलं आहे. तो म्हणतो आहे की, त्याला कुणाचा अपमान करायचा नव्हता. याबाबत मंगळवारी अभिनेत्याने माफीनामा जारी करीत ट्विट केले आहे. यात त्याने लिहिले, “प्रिय सायना, मी एका दिवसापूर्वी तुझ्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहिलेल्या माझ्या असभ्य वर्तनामुळे मला तुझी माफी मागायची आहे. मी अनेक गोष्टींवर तुझ्याशी असहमत असू शकतो. परंतु माझी निराशा किंवा राग आधीचा आहे. तुझे ट्विट वाचून मी माझ्या शब्दांना न्याय देऊ शकत नाही.”

पुढे सिद्धार्थने लिहिले कि, “एखाद्या विनोदाला समजावून सांगायचे असल्यास, तो विनोदही राहत नाही. त्यामुळे मी माझ्या विनोदाबद्दल माफी मागतो. मी माझ्या शब्द निवडीवर आणि विनोदावर जोर दिला पाहिजे. यामागे खरंच माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. “मी स्वतः एक कट्टर स्त्रीवादी समर्थक आहे आणि मी तुला खात्री देऊ शकतो की माझ्या ट्विटमध्ये कोणतेही लिंगसंबंधित विधान नव्हते आणि एक महिला म्हणून तुझ्यावर शाब्दीक हल्ला करण्याचा नक्कीच माझा कोणताही हेतू नव्हता.” “आशा आहे की तु या सर्व गोष्टी विसरशील आणि माझी माफी स्वीकार करशील. तु नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन आहेस.”