Take a fresh look at your lifestyle.

Indian Police Force’च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा जखमी; ॲक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा चित्रपट म्हणजे फुल्ल ऑन ॲक्शन, ड्रामा आणि मनोरंजनाचा पूर्ण तडका. यामुळे त्याचा आगामी प्रोजेक्ट नेहमीच चर्चेत असतो. चित्रपट क्षेत्रानंतर आता रोहित शेट्टी वेब सीरिजच्या विश्वात पदार्पण करतोय आणि ते हि थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर. त्याच्या आगामी कॉप वेबसिरीजची सध्या चर्चा आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी कॉप भूमिकेत दिसतील. दरम्यान एक ॲक्शन सीन करताना सिद्धार्थ जखमी झाला असून याबाबत त्याने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.

‘इंडियन पुलिस फोर्स’ या कॉप वेबसिरीजमुळे सिद्धार्थ चांगलाच चर्चेत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या वेब सीरिजचं शूटिंग गोव्यात सुरु आहे. याच शूटिंग दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जखमी झाल्याचे समजत आहे. एका अॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान सिद्धार्थला या जखमा झाल्या आहेत. सिद्धार्थने आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबतची माहिती देताना एक व्हिडीओ आणि रोहित शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये तो आपल्या हाताला लागलेली जखम दाखवताना दिसतो आहे. हा व्हि़डीओ शेअर करत त्याले लिहिलं आहे कि, ”रोहित शेट्टीच्या मते असली हिरो तुम्ही तेव्हाच जेव्हा तुम्ही खरा घाम गाळता आणि खरं रक्त तुमचं वाहतं. रोहित सर गोव्यात अशाच जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्सचं शूट करुन घेत आहेत”.

रोहित शेट्टीसोबत काम करण्याची हि सिद्धार्थ मल्होत्राची पहिलीच वेळ आहे आणि सिद्धार्थ हे क्षण अतिशय एन्जॉय करतोय असच दिसतंय. रोहित शेट्टीची बहूचर्चित ;इंडियन पुलिस फोर्स’ हि कॉप वेब सिरीज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर लवकरच येणार आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून रोहित शेट्टीसह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हेदेखील पहिल्यांदाच ओटीटीवर दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हि वेब सिरीज अत्यंत लक्षवेधी आणि उत्सुकता वाढवणारी ठरतेय. यातील कलाकारांचे फर्स्ट लूक चांगलेच व्हायरल झाले आहेत.