Take a fresh look at your lifestyle.

खरा चाहता !! सोनू सूद साठी त्याने चालवली तब्बल 2000 किमी सायकल

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | क्रिकेटपटू असो वा बॉलीवूड कलाकार, त्यांच्या चाहत्यांची काही कमी नाही. आपल्या आवडत्या कलाकारावर प्रेम करणारे चाहते जगभर आहेत. काही चाहते तर आपल्या लाडक्या कलाकारासाठी काहीही करण्यास तयार असतात. आता सोनू सूद च्या चाहत्याने सुद्धा अस काही केलं आहे की त्याची दखल सोनूला घ्यावी लागली

नारायण व्यास नावाच्या सोनूच्या एका चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराची भेट घ्यायची होती. सोनू करत असलेल्या सामाजिक कार्याला समर्थन देण्यासाठी त्यानं चक्क महाराष्ट्रातील वाशिम येथून सायकलवर प्रवास सुरु केला तो थेट रामसेतू पर्यंत. हे अंतर 2000 किमी चे असून ते पार करण्यासाठी त्याला 7 दिवस लागले. आता नारायण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची दखल सोनूनं घेतली आहे. त्याचे कौतूकही केले आहे. रविवारी सोनूनं त्याची भेट घेतली. आणि त्याला पाठींबा दिला.

सोनूनं रविवारी त्याची भेट घेऊन त्याचा उत्साह वाढविला आहे. त्याचे कौतूकंही केले आहे. बी ए पर्यत शिक्षण घेतलेला नारायण हा वाशिममधील एका कॉलेजात शिपाई म्हणून काम करतो. 7 फेब्रुवारीला नारायण वाशिम येथून निघाला. त्याने आपला सायकल यात्रा 14 फेब्रुवारीला रामसेतू येथे संपवली. त्याचा प्रवास हा 5 राज्यांतून होता. वेगवेगळ्या राज्यात त्याचे जंगी स्वागत झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.