Take a fresh look at your lifestyle.

सोनू सुदला यूजरने मागितला आयफोन ; सोनूने दिले भन्नाट उत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड एक्टर सूनू सूद ने आपल्या दरियादिलीतून लोकांचे लक्ष वेधले. जे लोकांना खरंच मदतीची गरज असते अशा लोकांना सोनू मदत करत असतो. परंतु काही लोक मात्र सोनू ला आगळीवेगळी मागणी करत असतात. आता तर एका यूजर ने त्याला चक्क आयफोनची मागणी केली आहे. सोनू सूदने या युजरला मजेदार उत्तर दिले.

ट्विटर वर एका युजरने सोनू सूद यांना ट्वीट करून आयफोनची मागणी केली, “सर अँपल आयफोन हवा आहे. मी यासाठी सुमारे 20 वेळा ट्वीट केले आहे. या ट्विटवर सोनू सूदने उत्तर दिले की,” मलाही फोन हवा आहे आणि यासाठी मी 21 वेळा ट्विट करू शकतो. ”सोनू सूद यांच्या या उत्तरावर सोशल मीडिया वापरकर्ते मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

अलीकडेच सोनू सूद राजकारणात येण्याविषयी बोलला. ते म्हणाले, मला गेल्या दहा वर्षांपासून एका राजकीय पक्षामध्ये जाण्याची ऑफर देण्यात आली आहे. बरेच लोक म्हणाले की मी एक चांगला नेता होऊ शकतो, परंतु मला अभिनेता असल्यासारखे वाटते. मला खूप पुढे जावे लागेल. माझ्याकडे अद्याप बर्‍याच गोष्टी करायच्या आहेत. मी कधीही राजकारणात येऊ शकतो. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’