Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूदच्या मदतीमुळे तो तब्बल 12 वर्षांनंतर स्वत:च्या पायावर राहिला उभा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाउन पासून गरीब मजूर आणि कष्टकर्यांना मदत करताना दिसत आहे. कोणाच्या शिक्षणाची व्यवस्था करायची असो वा कोणाला नोकरी द्यायची असो किंवा कोणाला घर बांधून द्यायचे असो, सोनू सूद नेहमीच गरजू व्यक्तींच्या पाठिशी उभा राहिला आहे. आता तर सोनू सूदने केलेल्या मदतीमुळे एका गरीब घरातील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अमन नावाच्या एका तरुणाला आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली आहे.

छत्तीसगड इथे राहणाऱ्या अमनला पायाच्या हाडाचं दुखणं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षांपासून तो स्वत:च्या पायावर उभं राहू शकत नव्हता. अमनचे वडील ड्रायव्हर आहेत. तर आई घरीच असते. त्यांच्याकडे स्वत:चं घरही नसल्यामुळे हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होतं. एकूणच घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अमनवर उचपार करणं त्याच्या कुटुंबाला शक्य होत नव्हतं. आजारामुळे गेली 12 वर्ष हा तरुण अंथरुणाला खिळून होता. सोनू सूदला त्याच्या आजाराबद्दल माहिती मिळाली असता त्याने अमनला मदत करण्याचं ठरवलं.

सोनू सूदने लवकरात लवकर अमनला त्याच्या त्रासातून मुक्त करण्याचा चंगच बांधला. त्याने न्यूरो सर्जन डॉ. अश्वनी यांची भेट घेतली. डॉक्टर अश्वनी हे प्रसिद्ध सर्जन असून त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 1 हजारापेक्षा रुग्णांवर उपचार केले आहेत. अमनची सर्जरीदेखील यशस्वी झाली असून तो आता स्वत:च्या पायावर उभा राहायला लागला आहे.

दरम्यान, सोनू सूद नेहमीच गरिबांसाठी देवदूत म्हणून समोर येत असून लोकांनी त्याच्या या कार्याचे कौतुक केलं आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र खरच नायक ठरला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.