सोनू सूद पुन्हा ठरला ‘देवदूत’ ; २२ वर्षीय मुलीच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | कोरोना काळात सोनू सूद हा आत्तापर्यंत कष्टकरी मजूर आणि कामगारांसाठी संकटमोचक म्हणून समोर आला आहे.आत्तापर्यंत ज्या ज्या गरजू लोकांनी सोनूला मदत मागितली आहे तेव्हा तेव्हा सोनू त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. मग ते एखाद्या नोकरी गेलेल्या मुलीला नोकरी देणे असो किंवा शेतात मुलींच्या सहाय्याने नांगर फिरवणाऱ्या गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर देणे असो. आता सोनूने एका २२ वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर येथील २२ वर्षीय प्रज्ञा मिश्राला सोनू सूदने आर्थिक मदत केली आहे. तिचे वडिल गोरखपूर येथील एका मंदिराचे पुजारी आहेत. लॉकडाउनमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. अशातच प्रज्ञाच्या पायाला दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी तिला गुडघा प्रत्यारोपण श्स्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे प्रज्ञाने सोनू सूदकडे मदत मागितली होती.
अपाहिज कैसे होने देते आपको बहन।
जल्द ही गाँव में दौड़ती हुई दिखोगी ।
देश बदलेगा। https://t.co/0cXQFT7rMj
— sonu sood (@SonuSood) August 9, 2020
सोनू सूद सर कृपया माझी मदत करा. मला अपंग होण्यापासून वाचवा’ असे म्हणत प्रज्ञाने तिचे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन शेअर केले होतो. सोनू सूदने तिचे ट्विटपाहून तिला लगेच मदत केली. ‘माझे तुझ्या डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. तुझी शस्त्रक्रिया पुढच्या आठवड्यात होणार आहे. लवकर बरी हो’ असे सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटले होते.
Comments are closed.