Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता सोनू सूद राजकीय आखाड्यात उतरणार?? म्हणाला की…

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाउन दरम्यान गरीब आणि मजूर लोकांच्या मदतीला धावून गेला होता. अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोचवणे, नोकरी गेलेल्याना नोकरी देणं, गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे, अश्या अनेक कामांमुळे सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला. मात्र, लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद लोकांना मदत करत होता त्यावेळी अनेक राजकारणी लोक देखील त्याला भेटत होते आणि अनेक राजकीय पक्षांकडून त्याला ऑफर आल्या होत्या. यामुळे एक चर्चा अशी होती की, तो राजकारणात प्रवेश करणार आहे. मात्र, यासर्वांवर आता सोनू सूदने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार सोनू सूद म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मला अजून खूप पुढे जायचे आहे. मी जी स्वप्ने पाहिली ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत आणि मला असे वाटते की, मी प्रथम ते पूर्ण करणे आवश्यक आहे. राजकारणात येण्यासाठी कुठलाही विशिष्ट वेळ ठरलेला नसतो आणि राजकारणामध्ये येण्याचा विचार मी 5 किंवा 10 वर्षांनंतर करेल.

पुढे सोनू सूद म्हणाला की, मला वाटते की ज्या गोष्टींमध्ये मी एक्सपर्ट आहे त्या गोष्टी मी अगोदर केल्या पाहिजेत आणि मी त्याला न्याय देऊ शकतो. मी जर सध्याच राजकारणात प्रवेश केला तर गावोगावी जाऊन लोकांना मदत करू शकणार नाही. म्हणून मी आताच राजकारणात प्रवेश करणार नाही कारण मी त्या पदाला सध्या न्याय देऊ शकत नाही. आता एक अभिनेता म्हणून खूप काही करायचे राहिले आहे आणि आता मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.