Take a fresh look at your lifestyle.

२०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सुशांतला केलं जाणार सन्मानित

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२१ मध्ये सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मात्र, हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी रंगणार याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’