Take a fresh look at your lifestyle.

कंगना रणौत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळली; म्हणून या अभिनेत्याने केली कानउघडणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. असे सरकार वारंवार बजावत असताना देखील समाजाचे भान असल्याचे नमूद करणारी कंगना मात्र विनामास्क फिरतेय. कित्येकदा चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला आपला आदर्श मानत असतात. अश्यावेळी कलाकारांचे हे असे वागणे योग्य नाही. शिवाय सोशल मीडियावरून सामाजिक आणि राजकिय प्रश्नांवर आपले परखड मत मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतकडून तर हि अपेक्षाच नाही. त्यामुळे अभिनेता सुयश राय याने खड्या शब्दांत कंगनाच्या कृत्याची निंदा केली आहे.

नुकतेच मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर तिला विनामास्क पाहण्यात आले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. सुरुवातीला तिने फोटोग्राफर्सना पोझ देण्यासाठी नकार दिला. पण नंतर ती पोझ देऊन फोटो काढताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अभिनेता सुयश रायने कमेंट करून संताप व्यक्त केला आहे.

Suyash Rai Post

कंगनाच्या या व्हिडिओवर सुयशने दिलेली कमेंट साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या कमेंटमध्ये लिहिले आहे की, जगाला ज्ञान द्यायला सगळ्यात पुढे येतात. मूर्खपणाचा कळस…. सुयशच्या या कमेंटबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यानंतर त्याची पत्नी अभिनेत्री किश्वर मर्चंटने देखील कंगनाला “मास्क कहा है मॅडम? असे म्हणत सुनावले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.