Take a fresh look at your lifestyle.

माझे स्वप्न खरे ठरले; अभिनेता उपेंद्र लिमयेने पालेकरांसोबत काम केल्याचा आनंद केला व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘२००- हल्ला हो’ हा झी ५ चा आगामी चित्रपट असून याचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाबाबत एक अलग उत्सुकता लागलेली आहे. खरतर प्रत्येक प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची आतुरता वेगवेगळ्या कारणांशी संबंधित आहे. दरम्यान महत्त्वाचं म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे अगदी एक दशक म्हटले तरी चालेल. इतक्या कालावधीनंतर बॉलिवूड जगतातील जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर आपल्या चाहत्यांसाठी परतले आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह मराठी अभिनेता उपेंद्र लिमये देखील काम करताना दिसणार आहे आणि याच्याविषयी त्याने आपण आनंद व्यक्त केला आहे.

या चित्रपटात मराठी अभिनेता उपेंद्र लिमये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत आणि ज्येष्ठ अभिनेता अमोल पालेकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. याबाबत बोलताना उपेंद्र म्हणाला, “माझ्या पिढीमध्ये दोन सुपरस्टार असायचे, एक श्री अमिताभ बच्चन आणि दुसरे अमोल पालेकर. सामान्य मध्यमवर्गीय पुणेरी कुटुंबातील असल्याने मी श्री पालेकरांचा चाहता होतो आणि आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला इतक्या मोठ्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अमोल पालेकर यांनी मला अनेक वेळा दिग्दर्शित केलं आहे. परंतु ‘२००-हल्ला हो’ मध्ये मला त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली जे माझ्यासाठी एक स्वप्नच आहे. जे माझ्यासाठी खरे ठरले. यांच्याव्यतिरिक्त अनेक प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता. यामध्ये सुषमा देशपांडे, गौतम जोगळेकर, रिंकू राजगुरू सारख्या मराठी चित्रपट जगतातील अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे – एकूणच तो एक अद्भुत अनुभव होता प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.

योडली फिल्म्स निर्मित, सारेगामा चित्रपट निर्मिती शाखा, सार्थक दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित, ‘२००- हल्ला हो’ या चित्रपटाचा झी 5 वर २० ऑगस्ट २०२१ रोजी प्रीमियर होईल. या चित्रपटाची कथा एका सत्य कथेने प्रेरित असून अत्यंत प्रभावशाली आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, २०० – हलला हो, हा चित्रपट २०० दलित महिलांनी खुल्या न्यायालयात गुंड, दरोडेखोर आणि बलात्काऱ्याला मारहाण करून कायदा आणि न्याय कसा मिळवला याची दर्जात्मक कथा आहे.‘२००- हल्ला हो’ मध्ये अमोल पालेकर, वरुण सोबती, रिंकू राजगुरू, साहिल खट्टर, सलोनी बत्रा, इंद्रनील सेनगुप्ता आणि उपेंद्र लिमये सारखे उत्तम कलाकार आहेत.