Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत बिघाड; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 23, 2022
in Hot News, Breaking, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Vikram Gokhale
0
SHARES
357
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात गेल्या चार दशकांहून अधिक काळ विविध माध्यामातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेते विक्रम गोखले याना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप त्यांना नेमके काय झाले आहे..? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Veteran actor Vikram Gokhale was admitted to Pune's Deenanath Mangeshkar Hospital a few days back. His condition remains critical

(File pic) pic.twitter.com/VparQPEdb9

— ANI (@ANI) November 23, 2022

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यामुळे उपचारार्थ त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत काही ना काही कुरबुरी सुरु होत्या असेही सांगण्यात येत आहे. मात्र आज अचानक तब्येत अधिक खालावल्याचे लक्षात येताच त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि आता तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोखले यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीसाठी अनेक चाहते प्रार्थना करू लागले आहेत.

आजतागायत गोखलेंनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या. नुसत्या साकारल्या नाहीत तर गाजवल्या. यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज मनोरंजन विश्वात त्यांच्याकडे आदराच्या भावनेने पाहिले जाते. आपल्यापुढील अनेक पिढ्या बनविण्यात त्यांनी आपले योगदान दिले आहे. यामुळे आज त्यांची प्रकृती खालावल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. इतकेच नव्हे तर मनोरंजन विश्वातून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रकृतीची काळजी करत आहेत. अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्यामुळे अधिक कोणतीही माहिती देता येत नाही आहे.

Tags: Admitted In Hospitalmarathi actorPunevikram gokhale
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group