Take a fresh look at your lifestyle.

‘ॲक्टर्सचे आयुष्य सोपे नसते’; अभिनेत्री रश्मिका मंदानाकडून सिनेइंडस्ट्रीचे सत्य उघड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आपल्या सहज सोप्या अभिनयाने आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर जगभरातील तरुण वर्गाला आकर्षित केले आहे. यामुळे तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. नुकतीच अल्लू अर्जुनसोबतच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे ती खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. दरम्यान, रश्मिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये इंडस्ट्रीतील स्टार्सचे आयुष्य सोपे नसते आणि स्टार बनणे खूप कठीण असल्याचे तिने सांगितले आहे. नक्की काय म्हणाली रश्मिका जाणून घेऊयात.

रश्मिका मंदानाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये म्हटले आहे कि, ‘ॲक्टर्सचे आयुष्य सोपे नसते. प्रत्येकाला माहित आहे की, यशस्वी अॅक्टर्स विलासी जीवन जगतात. मात्र त्यांच्या आयुष्यातही अशा काही गोष्टी घडतात ज्या खूप त्रास देतात. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जम बसवण्यासाठी अनेक त्याग आणि कष्ट घ्यावे लागतात. खूप मेहनतही करावी

लागते.” ज्यांना अॅक्टर व्हायचे आहे, त्यांना तिने असा सल्ला दिला. चित्रपटातील स्टार्स अनेकदा ज्या वेदनांमधून जातात, त्याची झलक दाखवणे हा त्यांचा उद्देश होता. वास्तविक, या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या हाताचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘जर तुमच्यापैकी कोणाला अॅक्टर व्हायचे असेल तर हे जाणून घ्या की यात फक्त चांगलेच नाही तर आणखी बरेच काही आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला प्रत्येक वेळी लेझर करावे लागते आणि जे खूप दुखते.’