Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री अदिती सारंगधरने तिच्या हटके अंदाजात दिल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अगदी काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. मात्र या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस उतरल्या आहेत.मात्र या मालिकेतील नकारात्मक भूमिका देखील लोकांना अतिशय भावतेय, मालविका या नकारात्मक भूमिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर दिसतेय. तशी अदिती आधीपासूनच लोकांची लाडकी होती मात्र आता लोक तिच्या नकारात्मक भूमिकेवरही प्रेम करीत आहेत. काल अदितीचा संसार ८ वर्षांचा झाला. यासाठी तिने आपल्या पतीला तिच्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आपल्याला मालविका या भूमिकेत आदिती सारंगधर हि अभिनेत्री पाहायला मिळत आहे. आदितेने या मालिकेत साकारलेली खलनायिकेची भूमिका तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे. भले या मालिकेत अदितीने खलनायिका साकारली असेल. पण खऱ्या आयुष्यात अदिती अत्यंत गोड, समजदार आणि मजेशीर व्यक्ती आहे. काल अदितीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यासाठी तिने खास अंदाजात तिच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या दोघांचा एकत्र एक क्यूट फोटो पोस्ट करत आपल्या लग्नाला आठ वर्षं झाली असे तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अदितीचे लग्न सुहास रेवांदेकर यांसोबत २५ मे २०१३ ला झाले. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला तिचे कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि चित्रपट या अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवला आहे. रुईया कॉलेजमध्ये असताना आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेल्या मंजुळा या एकांकिकेपासून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीचा शुभारंभ केला होता. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही उलट तिने आणखीच वेग धरला. एकांकिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत तिने आपली वाट छोट्या पडद्याकडे वळविली. मग छोट्या पडद्यावरील ‘दामिनी’, ‘वादळवाट’, ‘लक्ष्य’ अशा मालिकांमधून ती घराघरात पोहचली. ‘नाथा पुरे आता’ या चित्रपटाच्या माध्यमातून तुने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर विविध सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. ‘प्रपोजल’ हे नाटक अदितीच्या कारकिर्दीतील सगळ्यात प्रसिद्ध आणि यशाचं कारण आहे. या नाटकातील भूमिकेसाठी विविध पुरस्काराने अदितीला गौरविण्यात आले होते.