Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमीषा पटेलच्या 47’व्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन; ‘कहो ना प्यार है’ म्हणत अभिनेत्रीने गाजवला डान्स फ्लोअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ameesha Patel
0
SHARES
609
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हि सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गदर २’मूळे चांगलीच चर्चेत आहे. शिवाय ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळे चाहत्यांच्या गॉसिपचा भाग होत असते. नुकताच ९ जून रोजी आमिषाचा ४७ वा वाढदिवस झाला आणि यानिमित्ताने तिने जंगी सेलिब्रेशन केलं. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ती नाइट क्लबमध्ये गेली होती आणि येथील तिचा एन्जॉय करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अमिषा तिच्या खास फ्रेंड्ससोबत बर्थ सेलिब्रेशन करताना दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अमीषा तिच्या मित्र मैत्रिणींसोबत डान्स फ्लोअरवर दिसते आहे. यावेळी ती आणि तिचे फ्रेंड्स तिच्याच लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अमीषाने २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अमीषाबरोबर ह्रितिक रोशन मुख्य भूमिकेत होता आणि हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला होता. अमीषाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या याच चित्रपटातील एव्हरग्रीन सॉंग ‘कहो ना प्यार है’वर ती मित्रांसोबत नाईट क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

अमीषाने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होते. तिच्यासोबत क्लबमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक जण तिच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. शिवाय या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

मुख्य म्हणजे अमिषाच्या वाढदिवसानिमित्त तिचा गाजलेला चित्रपट ‘गदर- एक प्रेम कथा’ २२ वर्षांनी पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर एका तिकिटावर एक तिकीट फ्री अशी ऑफर देखील देण्यात आली आहे. अमिषाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘खूप मोठ्या ब्रेकनंतर ती लवकरच ‘गदर २’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags: Ameesha PatelBirthday CelebrationInstagram Postviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group