Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

करवीरच्या शोभायात्रेत मराठमोळ्या अभिनेत्रीने पदर खोचून चालवला दांडपट्टा; पाहणारे झाले थक्क

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 22, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Pawar
0
SHARES
424
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आहे. आज चैतन्याची गुढी उभारत येणाऱ्या नव्या वर्षाचे दिमाखात स्वागत केले जाते. आजच्या या खास दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते. या शोभा यात्रेत दरवर्षी अनेक लोक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होत असतात. हि शोभा यात्रा केवळ आकर्षण म्हणून नाही परंपरा म्हणून दरवर्षी आयोजित केली जाते. यंदा कोल्हापुरातील शोभा यात्रेत अनेक कलाकार मंडळी सहभागी झाले होते. यांपैकी अभिनेत्री अमृता पवार मात्र भारी चर्चेत आहे. याच कारण तिने आपली लोककला जोपासत या शोभायात्रेत दांडपट्टा चालवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

आज गुढीपाडव्यानिमित्त चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करणाऱ्या या शोभायात्रेत आणखीच जल्लोष भरण्यासाठी हि कलाकार मंडळी सहभागी झाली होती. कोल्हापूर येथील शोभायात्रेत अभिनेत्री अमृता पवार हिने दांडपट्टा चालवून मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री अमृता पवार ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री असून ती सध्या ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेवर प्रेक्षक अतोनात प्रेम करत आहेत. अशातच तीने यंदाची कोल्हापुरातील शोभायात्रा गाजवल्याने ती आणखीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

आज सकाळी अमृताने गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूर येथील शोभायात्रेत सहभागी होताना मराठमोळा पेहराव केला होता. तिने लाल रंगाची सुंदर काठापदराची साडी नेसली होती. केसांचा आंबाडा आणि त्यावर गजरा माळून ती अतिशय देखणी दिसत होती. यावेळी तिने शोभायात्रेत सेलिब्रिटी म्हणून नुसता सहभाग घेतला नाही तर खऱ्या अर्थाने ती शोभायात्रेचा भाग झाली. यामध्ये तिने दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक केलं आणि तिचा हा अंदाज पाहून सगळेच थक्क झाले. अमृताला पाहण्यासाठी गर्दी वाढली आणि अनेकांनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. अमृताच्या या कलाप्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Amruta PAwarCelebrating GudhipadvaInstagram Posttv actressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group