Take a fresh look at your lifestyle.

‘तू माझ्यासाठी एक अशी कलाकार आहेस जी…’; अंकिता लोखंडेची ‘अम्मू’साठी पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिच्या आयुष्यातील लहान सहान बाबींपासून ते आगामी प्रोजेक्टपर्यंत सगळ्यासाठी चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे नेहमी चाहत्यांच्या सानिध्यात असते. सध्या ती चर्चेत आहे ती अमृता खानविलकरबाबत पोस्ट केल्यामुळे. होय. अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट येऊ घातला आहे. या सिनेमाचं चंद्रा हे गाणं अलीकडेच रिलीज झालं आहे आणि याचं पोस्टर अंकिताने शेअर केलं आहे. यासोबत तिने एक कॅप्शन दिलं आहे. हे कॅप्शन चांगलाच चर्चेत आहे.

अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, “अमृता खानविलकर तू माझ्यासाठी स्टार नाहीस तर सेलिब्रिटी आहेस. खरी कलाकार आहेस”. “तू माझ्यासाठी एक अशी कलाकार आहेस जी आपल्या अभिनयाच्या जोरावर आम्हाला हसवू आणि रडवूही शकते. मला अजूनही चांगलं आठवतंय की जेव्हा आपण ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमात एकत्र होतो, तेव्हा तुझ्या आणि माझ्यामध्ये नेहमीच कोण चांगला नाचतो याची एक स्पर्धा असायची. पण तुलाही माहिती आहे की मी नेहमीच एक सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. बरोबर ना अम्मू? हा झाला विनोदाचा भाग.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

पुढे, पण काही दिवसांपूर्वी जेव्हा मी तुझ्या सिनेमाचं पोस्टर लाँच झालं. ते पाहिलं त्यावेळी माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. तुला तिथे पाहणं हे एखाद्या स्वप्नासारखं होतं आणि त्यांनी ज्या प्रकारे ते लाँच केले ते पाहून फक्त वाव इतकं वाटलं!” “तुला आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा…. तुला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी आतुर आहे. देव सदैव तुझ्या पाठिशी राहू देत… तू जशी आहेस तशीच राहा. खूप सारं प्रेम. २००४ पासून सुरू झालेली आपली मैत्री मरेपर्यंत कायम राहिलं”. अशा आशयाची पोस्ट अंकिताने केली आहे.