Take a fresh look at your lifestyle.

अनुष्का शर्मा बेबी बम्पसहित झळकली मॅगझीनवर

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. एका फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवर ती झळकली आहे. हा फोटो पाहून अनुष्काच त्याच्या प्रेमात पडली आहे. हा क्षण आपल्याला कायमचा जतन करायचा आहे, असं तिनं म्हटलं आहे. नव्या वर्षासाठी अनुष्कानं हे फोटोशूट केललं आहे.

अनुष्कानं VOGUE INDIA साठी बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फॅशन आणि लाइफस्टाईल मॅगझिनच्या जानेवारी 2021 च्या एडिशनसाठी हे फोटोशूट आहे. ज्यामध्ये अनुष्का आपलं बेबी बंप दाखवताना दिसते आहे. बोल्ड लूकमध्ये ती दिसते आहे. अनुष्काचा हा फोटो तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे. पण ती स्वतःही या फोटोच्या प्रेमात पडली आहे. Capturing this for myself , for life ! असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CJaywc2ps9U/?utm_source=ig_web_copy_link

अनुष्का आपली प्रेग्नन्सी एन्जॉय करताना दिसते आहे. आता विराट आणि अनुष्कालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही नव्या वर्षासह त्यांच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची उत्सुकता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.