Take a fresh look at your lifestyle.

सौभाग्यदात्री देवी लक्ष्मी! अपूर्वाच्या फोटोशूटमूळे नवमी झाली सफल; भाविकांनी घेतले देवीच्या अधिष्ठात्री स्वरूपाचे दर्शन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात नवरात्रीचा उत्सव सुरु असून आज नवमीचा दिवस आहे. नवरात्रीनिमित्त अभिनेत्री अपूर्व नेमळेकरने आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधणारे एक सुंदर फोटोशूट केले आहे. यात तिने देवीची नानाविध रूपे आणि मूळ स्थानांविषयी माहिती दिली आहे. तिने साकारलेली देवीची रूपे इतकी सुंदर आणि लक्षवेधक आहेत कि सोशल मीडियावर तिचे चाहते आणि अगदी भाविक भरभरून कौतुक करीत आहेत. आज तिने देवी लक्ष्मीचे सुखकारक स्वरूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले आहे.

देवी लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. देवी लक्ष्मी त्रिदेवांपैकी एक श्री विष्णू यांची पत्नी आहे. देवी लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्र मंथनातून निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून देवी लक्ष्मी उत्पन्न झाली. देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आणि आई तिरंगिनी यांची कन्या आहे.

आज नवरात्रीच्या नवव्या दिवसाचे औचित्य साधून अपूर्वाने माता लक्ष्मीचे नयनरम्य स्वरूप धारण केलेले फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, नवरात्रीचा नऊवा दिवस आणि दसरा. रंग – जांभळा. देवी- लक्ष्मी. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. दसरा ,चांगल्याचा वाईटावरील विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. दसरा म्हणजेच विजयदशमी. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केले होते तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केले होते. तिसऱ्या दिवशी कर्नाटक उडपी येथील दुर्गा परमेश्वरीचे मनमोहक रूप तर चौथ्या दिवशी राशीनची यमाई माता स्वरूप धारण केलेले फोटोशूट तिने शेअर केले आहे. यानंतर पुढे पाचव्या दिवशी बंगाली देवी आणि सहाव्या दिवशी कार्ल्याच्या एकविरा आईचे नयनरम्य स्वरूप, पुढे सातव्या दिवशी चंद्रपूरची आराध्य देवता महाकालीचे अद्भुत स्वरूप तर आठव्या दिवशी तस्वरूपिणी देवी शारदा अर्थात सरस्वती मातेचे स्वरूप धारण केलेले फोटोशूट अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे.