Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री अर्चना निपाणकर विवाहबंधनात; शेअर केले फोटो

मुंबई | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अर्चना निपाणकरनं एक फोटो शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अर्चनानं तिच्या लग्नाचा फोटो शेअर हे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पार्थ रामनाथपूर याच्यासोबत अर्चना विवाहबंधानात अडकली असून चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

‘का रे दुरावा’ मालिकेतून अर्चनानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘१०० डेज’ या मालिकेत आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडितसोबत महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील तिच्या भूमिकेची देखील प्रचंड चर्चा झाली. काही महिन्यांपूर्वी अर्चनाचा साखरपुडा पार पडला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

तसंच अर्चनानं ‘पानिपत ‘सिनेमात राघोबादादा पेशवे यांच्या पत्नीची म्हणजेच आनंदीबाईची भूमिका साकारली होती. अर्चना आणि पार्थ कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते. कॉलेजमध्ये असतानाच प्रेम जुळलं आणि दोघांनी नातं पुढं नेण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.