Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्पष्ट पुरावे असूनही कारवाई का नाही..?; बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा न्यायासाठी आक्रोश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 27, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Bhagyashree Mote_Madhu Markandeya
0
SHARES
117
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधू मार्कंडेय हिचे १२ मार्च रोजी निधन झाले. बहिणीच्या निधनामुळे तिला धक्का बसला असला तरीही तिचा मृत्यू हा संशयास्पद असल्यामुळे भाग्यश्री न्याय मागते आहे. भाग्यश्रीची बहीण मधू हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली होती. निधनावेळी मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या होत्या. तसेच तिच्या निधनाची कथा रचित वाटत होती. दरम्यान काही स्पष्ट पुरावे हाताशी लागलेले असतानाही याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे भाग्यश्रीचा संताप होत आहे. म्हणूनच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यामध्ये बहिणीच्या मृत्यूबद्दल विविध खुलासे केले आहेत. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

हि पोस्ट शेअर करताना भाग्यश्रीने लिहिलंय कि, ‘मी केलेली ही पोस्ट धमक्या देण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी नाही. माझ्या अंतःकरणापासून मी सत्य सांगत आहे. १२ मार्च रोजी रविवारी सकाळी माझी बहीण केक बनवण्याचे सामान आणि दोन तयार केलेले केक घेऊन एका केक वर्कशॉपसाठी निघाली होती. ज्या महिलेकडे ती या वर्कशॉपसाठी जात होती तिला ती ३ ते ४ महिन्यांपासून ओळखत होती. तिच्याबरोबर काम करत होती. आमच्या माहितीनुसार तिला ५ महिलांबरोबर हे वर्कशॉप घ्यायचे होते’.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

पुढे लिहिलंय, ‘आता त्याच महिला सांगत आहेत की त्या दोघी खोलीच्या शोधात बाहेर पडल्या होत्या. रस्त्यात एका खोलीसाठी त्यांना बोर्ड लागलेला दिसला. त्यांनी मालकाशी संपर्क केला. त्या ठिकाणी गेल्या, तेव्हा त्यांचे तिथे अर्धा तास संभाषण झाले. त्यावेळी माझी बहीण अचानक खाली पडली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिचे पल्स सुरू नव्हते. त्यामुळे खासगी रुग्णालयाने तिला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर जेव्हा तिला वायसीएम रुग्णालयात नेले, तेव्हा तिचा एका तासापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले’.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

पुढे, ‘माझी बहीण सर्व काही ठरवून आणि खात्री करून निश्चित केलेल्या कार्यशाळेसाठी गेली, याचा स्पष्ट पुरावा आहे. एक दिवस आधी तिला त्यासाठी अॅडव्हान्स देखील मिळाला होता. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि डॉक्टरांनी देखील याची पुष्टी केली होती. हा सर्व प्रकार ज्या पद्धतीने घडला तो पूर्णपणे संशयास्पद होता. त्या ज्या ठिकाणी गेल्या होत्या, ते ठिकाण खूपच कमी रहदारीचे होते. त्या संपूर्ण भागात सीसीटीव्ही नव्हते.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

माझ्या बहिणीने खोली भाड्याने घेतली होती आणि व्यवसायासाठी तिचे एक ऑफिस होते. आर्थिक मदतीसाठी तिने पहिल्या वर्कशॉपची ऑर्डर घेतली होती. इतके दिवस आणि इतके स्पष्ट पुरावे मिळूनही याप्रकरणी कारवाई का होत नाही, याबद्दल मला शंका आहे. दिशाभूल करणारी आणि चुकीचे माहिती पसरवली आहे. मला कोणतीही स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागत आहे.’

Tags: bhagyashree MoteInstagram PostMarathi Actressmurder mysteryviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group