Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री दलजित कौरचा कौतुकास्पद निर्णय; स्वतः काढलेल्या चित्रांचा लिलाव करुन कोरोना रुग्णांसाठी उभारणार निधी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला असताना रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी काही रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या कठीण काळात अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतो आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आता. अभिनेत्री दलजित कौरनेसुद्धा आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एक निर्णय घेतला आहे. दलजितने स्वतः काढलेली चित्रे विक्रीसाठी ठेवून कोरोना बाधित रुग्णांसाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रांचे फोटो शेअर केले आहेत.

दलजितने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन सुंदर चित्रे पोस्ट केली आहेत. सोबत लिहिले कि, “जर माझ्याकडे अजून चित्रे असती तर अजून मोठी मदत निर्माण होऊ शकली असती. मला माहित नाही सध्या काय करणे योग्य आहे. आज हजारो लोक आयुष्याशी झुंज देत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे.अशावेळी मला वाटले कि माझ्या या चित्रांचा लिलाव करून, ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी मी थोडीफार आर्थिक मदत नक्कीच उभी करू शकते. ही चित्रे मी अत्यंत प्रेमाने काढलेली असून माझ्या घरीच कित्येक काळापासून आहेत. पण आता त्यांचा योग्य वापर करण्याची वेळ आली आहे.जास्तीत जास्त किंमतीमध्ये ही चित्रे विकून त्यातून मिळणारे पैसे दान करण्याचा माझा हेतू आहे.

विशेष म्हणजे हि चित्रे दलजितने स्वतः काढलेली असून तिच्या हृदयाच्या अत्यंत जवळच्या आठवणींतील आहेत. मात्र गरजेच्या वेळी आपलाही एक हाथ मदतीसाठी असावा ह्या हेतूने दलजितने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांकडून विशेष कौतुक होत आहे. तिच्या चाहत्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी दलजितचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या पोस्ट वर कमेंट करत लिहिले आहे कि, “तुझ्या या कार्याला माझा सलाम आहे. मला माहित आहे कि ही चित्रे तुझ्या किती जवळची आहेत आणि ती तयार करताना तू किती मेहनत घेतली आहेस.