Take a fresh look at your lifestyle.

संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी ; दिया मिर्झाचा कंगणाला पाठिंबा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर मुलगी म्हटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असं वक्तव्य अभिनेत्री दिया मिर्झाने केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन तिला रोषाचा सामना करावा लागला होता. तिच्या या वक्तव्या वरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणाला चांगलंच फैलावर घेतलं होत आणि त्यांनी कंगणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यातच अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ असं म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर ‘संजय राऊत यांनी माफी मागावी’, असं दिया म्हणाली आहे. तिने ट्विट करत तिचं मत व्यक्त केलं आहे.

screen dia

“संजय राऊत यांनी हरामखोर हा अत्यंत चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. सर, कंगनाने जे वक्तव्य केलं, त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा किंवा त्यावर मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र अशी भाषा वापरल्याप्रकरणी तुम्ही माफी मागावी”, असं ट्विट दियाने केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’