Take a fresh look at your lifestyle.

वडिलांनंतर दिपिका पादुकोणलाही कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सर्वसामांन्यांपासून नेता, सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. परिस्थिती पाहता शासनाने नियम आणखी कठोर केले आहेत. मात्र लोकांकडून नियमांना न जुमानण्याचा प्रकार वारंवार दिसून येत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असताना अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त होते. त्यांनतर आता दिपिका स्वतः देखील कोरोनाच्या जाळ्यात आली आहे. तिच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर, आता अभिनेत्री दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती मिळाली आहे. सध्या दीपिका बंगळुरु येथे सेल्फ क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार घेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. सध्या ते रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. असे सांगितले जात आहे की, त्यांच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा पाहता त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्याची शक्यता आहे. त्यातच, आता दीपिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. यात अक्षय कुमार, विकी कौशल, भूमी पेडणेकर, कॅटरिना कैफ यासारख्या कलाकारांचा समावेश होता.