Take a fresh look at your lifestyle.

दिशा परमार वैद्यच्या सिंदूर न लावण्यावर प्रश्नचिन्ह?; अभिनेत्रीने दिले ट्रोलर्सला प्रत्युत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायक राहुल वैद्यची पत्नी आणि अभिनेत्री दिशा परमार सध्या सोशल मीडिया ट्रोलर्सच्या कारनाम्यांवर चांगलीच भडकली आहे. याचे कारण म्हणजे तिच्या भांगात नसलेले सिंदूर. होय. काही दिवसांपूर्वी राहुल वैद्यने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे २ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्यानिमित्त चाहत्यांसोबत लाईव्ह सेशन केले होते. त्यावेळी अनेक चाहत्यांनी दिशाला सिंदूर का लावल नाही अशी विचारणा केली. यानंतर सातत्याने हा एकच प्रश्न तिला वारंवार सोशल मीडियावरून विचारला जात आहे. परिणामी आता तिचा उद्रेक झाला आहे. तिने या ट्रोलर्सला मेरी मर्जी टाईप उत्तर दिले आहे.

दरम्यान राहुलच्या इंस्टा लाईव्ह सेशनवेळी एका युझरने दिशाला तू सिंदूर का लावला नाहीस असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी दिशाने हा प्रश्न अगदीच चेष्टा मस्करीत घेतला आणि त्या युझरला उत्तर दिले की, ‘राहुलकडे वेळ नव्हता… त्यामुळे लावला नाही…’ यावर राहुलने उत्तर दिले, ‘अरे दिशा, तू आणि मी वेगवेगळ्या वेळी तयार होतो. त्यामुळे जेव्हा तू तयार होतेस तेव्हा सिंदूर तुझं तूच लावून घे… सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण आहे… आता उद्यापासून दिशा रोज सिंदूर आठवणीने लावेल… ज्याने कुणी सिंदूरची आठवण करून दिली त्याने देखील हे लक्षात ठेवावे…’

मात्र पुढे हा प्रश्न समस्या होऊ लागला. अलिकडेच दिशाने इंस्टावर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने गुलाबी साडी परिधान केली असून हातात लाल रंगाचा चुडा घातलेला दिसत आहे. हे फोटो शेअर करत दिशाने ‘हॅप्पी पपी’ असे लिहिले आहे. या फोटोंमध्येदेखील दिशाने सिंदूर लावलेल नाही. त्यावरून ‘तुमच्यामध्ये लग्न झाल्यानंतर सिंदूर लावत नाहीत का?’ अश्या प्रकारचे प्रश्न अनेक युजर्सने तिला ट्रोल करण्याच्या हेतूने पारा चांगलाच चढला. मग काय? तिने थेट ट्रोलर्सला ट्रोलर्सच्याच भाषेत उत्तर दिले.

सातत्याने सिंदूरवरून प्रश्न विचारून ट्रोल केल्यामुळे दिशांचे चिडणे साहजिकच होते. त्यामुळे तिने ट्रोलर्सला चांगलेच फैलावर घेतले आहे. तिने उत्तर देताना लिहिले, ‘ सातत्याने मी सिंदूर का लावत नाही, असा प्रश्न विचारून मला ट्रोल करणा-यांना हे उत्तर आहे… सिंदूर न लावणे हा माझा चॉईस आहे. मी सिंदूर लावेन अथवा लावणार नाही हा माझा प्रश्न आहे. तो न लावल्याने मला आणि माझ्या नव-याला काहीच प्रॉब्लेम नाही. इतकेच नाही तर माझ्या कुटुंबाचा देखील त्यावर काही आक्षेप नाही. तर तुम्हांला काय प्रॉब्लेम आहे?’ आता दिशांचे उत्तर मिळाल्यावर पुन्हा कुणी तिच्या सुंदरवर प्रश्न विचारेल असे काही वाटत नाही.