Take a fresh look at your lifestyle.

दिशा पटनीने पटकावला ‘मोस्ट डिजायरेबल वूमन’ चा खिताब

हॅलो बोलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी केवळ अभिनयच करत नाही तर तिच्या सौंदर्याबद्दलही बरीच चर्चेत असते. दिशाने अतिशय अल्पावधीत लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. दिशाने 2016 मध्ये एमएस धोनी या चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. अवघ्या चार वर्षात ती लोकांची पसंती बनली आहे. दीपिका पादुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सारख्या अभिनेत्रींना नमवून दिशाने वर्ष 2019 च्या मोस्ट डिजायरेबल वूमनचे विजेतेपद जिंकले आहे. या यादीत तिने पहिले स्थान मिळविले आहे.

बोल्ड आणि ग्लॅमरस लुक साठी प्रसिद्ध असलेल्या दिशाला चाहत्यांनी मतदान केले आणि तिला 2019 ची मोस्ट डिजायरेबल वूमन म्हणून निवडले. याबाबत ई-टाईम्सशी बोलताना दिशा म्हणाली, “मला चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. ही एक सुंदर भावना आहे. हे मजेदार आहे.

या यादीमध्ये सुमन राव, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण, वर्णिका सिंह, कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, यामी गौतम, आदिती राव हैदरी, जॅकलिन फर्नांडिस, शिवानी जाधव, आलिया भट्ट, तारा सुतारिया, गायत्री भारद्वाज, कृती सॅनॉन यांचा समावेश आहे.