Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री दिशा पटाणीच्या वडिलांना करोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीचे वडील जगदीश पटाणी यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांच्या अहवालात समोर आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जगदीश यांच्यासह वीज विभागाच्या अजून दोन अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. याबद्दल जिल्हा सर्विलान्स अधिकारी डॉ. अशोक कुमार यांनी माहिती दिली.

डॉ. अशोक कुमार यांनी बुधवारी सांगितलं की, दिशाचे वडील जगदीश पटाणी आणि विभागाचे अन्य दोन अधिकारी ट्रान्सफॉर्मर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी लखनऊ येथे आले होते. या तीनही अधिकाऱ्यांचा करोना रिपोर्ट आली असून ते पॉझिटिव्ह असल्याचं समजलं.

कुमार पुढे म्हणाले की, दिशाचे वडील विद्युत विभागाच्या दक्षता युनिटमध्ये डेप्युटी एसपी म्हणून कार्यरत आहेत. सध्या विभागीय मुख्य अभियंता कार्यालयाला ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे

Comments are closed.