Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ठरलं हो ठरलं! अभिनेत्री हंसिका मोटवानी पिंक सिटीमध्ये ‘या’ दिवशी लग्न करणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in Trending, Uncategorized, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hansika Motwani
0
SHARES
2.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच दिवाळी झाली आहे. आता तुळशीची लग्न देखील बघता बघता पार पडतील. मग जो तो लगीनघाईवर आलेला आपापल्या लग्नाचा मुहूर्त शोधू लागेल. बॉलिवूडमध्येही गेल्या काही काळापासून लग्न.. प्रेग्नेंसी असे सलग ट्रेंड पहायला मिळाले आहेत. अशातच बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा लग्नाची धामधूम पहायला मिळणार आहे. एकीकडे बॉलिवूड गायिका पालक मुच्छल आणि तिचा प्रियकर मिथुन यांच्या लग्नाची चर्चा आहे. तर दुसरीकडे,सिद्धार्थ – कियारासुद्धा लाईनमध्ये आहेत. यातच अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाचा मुहूर्त आणि शहर ठरलंसुद्धा. कधी..? कुठे..? आणि कुणासोबत.? चला जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध असणारी लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. माहितीनुसार, बॉलिवुड अभिनेत्री हंसिका मोटवानी येत्या ४ डिसेंबर २०२२ रोजी लग्न करणार आहे. तिचे लग्नविधी २ डिसेंबर २०२२ ते ४ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित केले आहेत. मुख्य म्हणजे हंसिका डेस्टिनेशन वेडिंग करतेय. कुठे माहितेय का..? पिंक सिटी अर्थात जयपूरमध्ये. या लग्न सोहळ्यासाठी ती फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र मैत्रीण यांनाच बोलावणार आहे. लग्न विधींमध्ये मेहेंदी, संगीत आणि हळद समारंभ पार पडेल. शिवाय प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट सुनियोजित ड्रेस कोड आणि थीम असणार आहे. तसेच हा शाही विवाहसोहळा जयपूरमधील मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यावर आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

आता प्रश्न उरला कुणासोबत लग्न करणार..? तर हंसिकाच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ती प्रेमविवाह करत आहे. म्हणजेच हंसिका तिच्या प्रियकराशी लग्न करतेय. मात्र अद्याप नवऱ्या मुलाचं नाव आणि ओळख याबाबत कोणीच काहीच माहिती उघड केलेली नाही. मात्र हंसिकाचा मित्र आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरियासोबत ती लग्न करतेय असं बोललं जातंय. हंसिका सोहेलसोबत २०२० पासून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी व्यवस्थापकीय भागीदार म्हणून काम करतेय. अद्याप याबाबत हंसिकाने किंवा तिच्याशी संबंधित इतर कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच याबाबत घोषणा केली जाईल असे सांगितले गेले आहे.

Tags: Hansika MotwaniInstagram PhotosViral NewsWedding Vibes
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group